ED Action
sakal
अंधेरी : ऑल पॅनेल एक्स्चेंज (एपीएक्स) या ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कथित ऑनलाइन बेटिंग आणि सायबर फसवणुकीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालय-२ ने सागर दाश याला अटक केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) मंगळवारी (ता. २७) ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने दाश याला तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली.