जामीनासाठी अर्णब गोस्वामी आता सर्वोच्च न्यायालयात

सुनीता महामुणकर
Tuesday, 10 November 2020

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे अलिबाग सत्र न्यायालयातही त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे अलिबाग सत्र न्यायालयातही त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.

उच्च न्यायालयाचे न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने गोस्वामींसह तीनही आरोपींचा जामीन काल फेटाळला. तसेच न्यायालयाने स्वतः च्या विशेषाधिकारांचा वापर करण्यासारखी सक्षम परिस्थिती याचिकादारांकडून दाखविण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी फौजदारी दंड संहिता 439 नुसार नियमित न्यायालयात जामीन अर्ज करावा, असे निर्देश दिले होते.

अधिक वाचा- ठाण्यात शेअर रिक्षांवर वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा, 26 हजारांचा दंड वसूल

गोस्वामी यांची अटक बेकायदेशीर आहे. ए समरी अहवाल असताना पोलिस तपास करु शकत नाही, असा दावाही युक्तिवादामध्ये करण्यात आला होता. मात्र हा दावा देखील अमान्य केला आहे. आरोपींप्रमाणे पीडित व्यक्तीलाही अधिकार असतात आणि त्याची बाजू सी समरी अहवालात यायला हवी. गोस्वामी यांना न्यायालयाने रिमांड दिलेला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अधिक वाचा-  लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेलेले दागिने मिळाले तब्बल 20 वर्षांनी, महिलेकडून पोलिसांचे आभार

उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात आता गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने जामीन मंजूर करण्याची मागणी केली आहे. मागील सात दिवसांपासून ते कारागृहात असून सध्या तळोजामध्ये आहेत.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

editor chief Republic TV Arnab Goswami today applied for bail Supreme Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editor chief Republic TV Arnab Goswami today applied for bail Supreme Court