

Education Department orders to Declare Universities results
ESakal
मुंबई : राज्यातील अनेक सार्वजनिक विद्यापीठांकडून निकाल वेळेत जाहीर केले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उच्य शिक्षण विभागाकडून राज्यातील काही विद्यापीठे आणि उच्य शिक्षण संस्थांना वारंवार सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखेर विभागाने कठोर भूमिका घेत राज्यातील सर्व सार्वजनिक अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांना ३१ जुलैपर्यंत सर्व प्रलंबित परीक्षा निकाल कोणत्याही परिस्थितीत बाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.