लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात 'अंडी'फेक, अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आज मोठा राडा बघायला मिळाला. पीएसआय भरतीमध्ये एकही जागा राखीव नं ठेवल्यामुळे वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट एमपीएससीच्या बोर्डवर अंडी फेकली आणि अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आज मोठा राडा बघायला मिळाला. पीएसआय भरतीमध्ये एकही जागा राखीव नं ठेवल्यामुळे वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट एमपीएससीच्या बोर्डवर अंडी फेकली आणि अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हेही वाचा: जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स.. १६३ वर्ष कलेचा साक्षीदार 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पीएसआय भरतीसाठी जाहिरात दिली होती. मात्र यात वंजारी समाजासाठी एकही जागा राखीव न ठेवल्यानं वंजारी समाज आक्रमक झाला होता. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वंजारी युवक संघटनेचे काही कार्यकर्ते अचानक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात घुसले आणि आंदोलन सुरू केलं. या भरतीसाठी जागा राखीव ठेवाव्या या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात असलेल्या बोर्डवर अंडी फेकली आणि तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा प्रयत्न केला. अचानक हे आंदोलन झाल्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

हेही वाचा: तुमच्या घरासमोर अचानक वाघ,सिंह अवतरला तर? .. 

काही दिवांसापूर्वी भाजप नेत्या आणि माजी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट केलं होतं. हे लक्षात आणून दिल्यावर कॅबीनेटमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतरही आज लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात हा गोंधळ झाला. 

याआधीही बीडमध्ये वंजारी समाजाकडून आंदोलन करण्यात आलं होतं. वंजारी समाजाला महाराष्ट्रात २ टक्के आरक्षण आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे संधी उपलब्ध होऊ शकत नाहीये त्यामुळे हे आरक्षण १० टक्के करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.  

eggs thrown by vanjari yuvak sanghatna at public service commission office


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eggs thrown by vanjari yuvak sanghatna at public service commission office