esakal | जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स... १६३ वर्ष कलेचा साक्षीदार !
sakal

बोलून बातमी शोधा

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स... १६३ वर्ष कलेचा साक्षीदार !

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स... १६३ वर्ष कलेचा साक्षीदार !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई:   भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स'. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं.  इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सनं आजपर्यंत अनेक मोठे कलाकार भारताला दिले आहेत. या कलाकारांच्या अगदी सुरुवातीपासून तर प्रसिद्ध कलाकार होण्यापर्यन्तच्या प्रवासाचं साक्षीदार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आहे. फक्त कलाकारच नाही तर काही राजकारणी व्यक्ति, व्यंगचित्रकार, अभिनेते हे देखील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्येच शिकले आहेत. आज जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स तब्बल १६३ वर्ष पूर्ण करत आहे.

हेही वाचा: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकले,अजित पवारांनी मागितली माफी 

 १६३ वर्षांचा मोठा वारसा : 

 • २ मार्च १८५७ -- जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना झाली.
 • उद्योजक असलेले 'सर जमसेटजी जिजेभॉय' यांच्या नावावर आर्ट्स स्कूलला नाव देण्यात आलं.
 • १८५७ -- या आर्ट्स स्कूलचा पहिला वर्ग 'एलफिस्टन इंस्टीट्यूटला घेण्यात आला.
 • १८६५ -- 'जॉन ग्रीफित्स' हे या आर्ट्स स्कूलचे मुख्याध्यापक झाले.
 • १८६६ -- या आर्ट्स स्कूलचे सगळे सूत्र भारत सरकारनं स्वत:कडे घेतले.
 • १८७८ -- जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला नवीन ईमारत मिळाली. 
 • १८७९ -- आर्ट्स स्कूलमध्ये ड्रॉइंगचे क्लास सुरू करण्यात आले. 
 • १८९३ --  शिक्षकांसाठी ड्रॉइंगचं ट्रेनिंग इथे सुरू करण्यात आलं.
 • १९०० -- जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये 'आर्किटेक्चर' विभागची स्थपना झाली. 
 • १९३५ -- 'हेड ऑफ स्कूल' ऐवजी 'डायरेक्टर' असं मुख्याध्यापकांना संबोधलं जाऊ लागलं. 
 • १९३७ -- एम. आर. आचरेकर हे आर्ट्स स्कूलचे 'डेप्युटी डायरेक्टर' झाले. 
 • १९४३ -- आर्ट्स स्कूलचे  'व्हि. एस. अदूरकर' हे पहिले भारतीय डायरेक्टर ठरले.
 • १९५८ -- जे जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये 'आर्किटेक्चर' आणि 'कला' असे दोन विभाग करण्यात आले. 
 • १९८१ -- जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला मुंबई यूनिवर्सिटीशी संलग्न करण्यात आलं. 

हेही वाचा: गडया फिरायला आपला देशच बरा ! 

यानंतर आजपर्यंत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सनं शेकडो हरहुन्नरी कलाकार संपूर्णं जगाला दिले आहेत. 

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे काही हिरे:

 • 'एम. एफ. हुसेन'-- प्रसिद्ध चित्रकार आणि पेंटर
 • 'दादासाहेब फाळके'-- दिग्दर्शक 
 • 'अमोल पालेकर'-- अभिनेते 
 • 'नाना पाटेकर'-- अभिनेते 
 • 'राज ठाकरे'-- मनसेचे अध्यक्ष 
 • 'नितीन देसाई'-- दिग्दर्शक आणि निर्माते
 • 'वामन ठाकरे'-- छायाचित्रकार 

हेही वाचा: टोलेबाजी,सामना संपादकपदावरून रामदास आठवले म्हणतात..  
 
अगदी आजच्या तारखेपर्यंत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स विद्यार्थ्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहे. नक्कीच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा १६३ वर्षांचा प्रवास सर्वांसाठीच खूप अभिमानास्पद आहे.   

sir j j school of arts completed 163 years today read special article

loading image