कोरोना नंतर ग्राहक संरक्षण विषयाच्या जागृतीबाबत आंतरराष्ट्रीय वेबिनार...

कृष्ण जोशी
गुरुवार, 9 जुलै 2020

कोरोनाच्या फैलावामुळे कंबरडे मोडलेल्या ग्राहकांच्या संरक्षणासाठी काय करणे आवश्यक आहे, त्यासाठी काय पावले उचलावीत, ग्राहकांची कशी परिस्थिती असेल यावर चर्चा करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. 

मुंबई  ः कोरोनाच्या फैलावामुळे कंबरडे मोडलेल्या ग्राहकांच्या संरक्षणासाठी काय करणे आवश्यक आहे, त्यासाठी काय पावले उचलावीत, ग्राहकांची कशी परिस्थिती असेल यावर चर्चा करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. 

आर्थर रोड कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांची 'सक्सेस स्टोरी'

सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी केवळ देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी (10 जुलै) संध्याकाळी पाच ते साडेसहा दरम्यान होणाऱ्या या वेबिनारमध्ये जिनीव्हा, लंडन येथूनही ग्राहक संरक्षण क्षेत्राशी संबंधित तज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. 

जगभर पसरलेल्या कोरोनामुळे सर्वत्र उद्योगधंदे बंद असून जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक-पर्यटन-हॉटेल क्षेत्रही अडचणीत असून गृहनिर्माण क्षेत्राच्या मंदीतही वाढ झाली आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर येऊ घातलेली बेकारी, पगार कपात यामुळे नजिकच्या काळात ग्राहकांची क्रयशक्तीही रोडावणार आहे. बॅंकाच्या ठेवींवरील व्याजात होणारी घट, वीजेची वाढती बिले, पेट्रोल/डिझेलचे वाढते दर याचीही भर पडत असून. त्यामुळे या आर्थिक मंदी व महागाईत ग्राहक होरपळुन निघण्याचीच चिन्हे आहेत.

#prabhas20 : प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर, १० जुलैला होणार नव्या सिनेमाची घोषणा - 
 
संयुक्त राष्ट्रसंघाची ग्राहक संरक्षणासाठीची मार्गदर्शक तत्वे‌ 1985 पासून अंमलात असूनही त्यावर जवळपास कोणत्याही देशात म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही. 2015 मधे या मार्गदर्शक तत्वांमधे सुधारणा करण्यात आली. आता त्याच मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन सध्याच्या परिस्थितीत ग्राहक संरक्षणासाठी सर्व देशांना एकत्र येऊन काय करता येईल, याबाबत या वेबिनारमध्ये चर्चा केली जाईल. उंक्टाड च्या ग्राहक संरक्षण विभागप्रमुख टेरेसा मोरेरा जिनिव्हातुन‌ सहभागी होतील तर रॉबीन सिम्पसन हे ग्राहक संरक्षण धोरणातील तज्ञ लंडन येथून मार्गदर्शन करतील. संयुक्त राष्ट्रांची सुधारीत ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अॅड शिरीष देशपांडे आणि मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके हेही यावेळी मार्गदर्शन करतील. या वेबिनारला भारतासह अन्य देशांतील‌ ग्राहक संस्थांचे प्रतिनिधी तसेच वकील आणि पत्रकारही उपस्थित राहणार आहेत. या वेबिनारसाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असुन त्याची लिंक ग्राहक पंचायतीच्या www.mymgp.org वर उपलब्ध आहे. तसेच हा कार्यक्रम मुंबई ग्राहक पंचायतीच्या फेसबुक लाईव्ह मार्फत सुद्धा बघता येईल.

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International webinar on consumer protection awareness after Corona ...