विधिमंडळ अधिवेशनात ‘जीटीएस’ प्रकरण गाजणार

Maharashtra Legislative Assembly
Maharashtra Legislative Assembly sakal media

मुंबई : राज्य अतिथींसाठी आरक्षित वाहनांचा गैरवापर (Misuse of reserve vehicle), सुट्या भागांमध्ये हेराफेरी आणि दुरुस्तीच्या नावावर आर्थिक अनियमितता (Financial irregularity) प्रकरण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) गाजण्याची शक्यता आहे. ‘जीटीएस’मधील गैरप्रकाराबाबत (GTS) ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल घेत महादेव जानकर, मनीषा कायंदे, चंद्रकांत पाटील, चेतन तुपे, क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील, मंदा म्हात्रे या आठ आमदारांनी तारांकित प्रश्न (Star question) उपस्थित केले आहेत.

Maharashtra Legislative Assembly
ऑनलाईन शिकवणीदरम्यान टिकली, बांगड्यांना बंदी का ?

तत्कालीन जीटीएस नियंत्रक किशोर गायकर यांच्या प्रकरणात निवृत्त झालेले जीटीएस संचालक आणि नियंत्रक क्रांती पाटील यांनी केलेल्या चौकशीत अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. त्यानंतर मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी दोषारोप पत्र दाखल करून ते मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र अद्याप कारवाई प्रलंबित आहे. तत्कालीन संचालक सतीश जोंधळे यांनी आरक्षित वाहनांचा खासगी वापर केल्याचे उघड झाल्याने त्यांच्यासंदर्भातील चौकशी सध्या सुरू आहे.

याप्रकरणी जीटीएस वाहनचालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप करत व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींची सुरक्षा धोक्यात असल्याचा इशारा दिला होता; मात्र राजशिष्टाचार विभागाकडून कारवाईसाठी तत्परता दाखवली जात नसल्याने ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल घेत तब्बल आठ आमदारांनी आगामी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यात त्यांनी सखोल चौकशीची आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

Maharashtra Legislative Assembly
पनवेल महापालिकेच्या नोटीसांची केली होळी; आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

सतीश जोंधळे यांच्यावरील आरोप

तत्कालीन संचालक पदावर कार्यरत असलेल्या सतीश जोंधळे यांनी परवानगी नसतानाही राज्य अतिथींच्या वाहनांचा खासगी वापर केला आहे. त्यांचे मूळ गाव असलेल्या संगमनेरमध्ये जाण्यासाठीही त्यांनी व्हीआयपी वाहनांचा वापर केल्याचा आरोप आहे. जीटीएस विभागातून जलसंपदा विभागात बदली झाल्यानंतरही त्यांच्या खासगी वाहनावर शासकीय चालकाचा वापर केल्याचा आरोप जीटीएस वाहनचालक संघटनेने केला असून तशी तक्रारही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

किशोर गायकर यांच्यावरील आरोप

सतीश जोंधळे यांच्याच कार्यकाळात किशोर गायकर नियंत्रक पदावर कार्यरत होते. गायकर यांनी व्हीआयपी वाहनांच्या सुट्या भागांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप आहे. खासगी कामासाठी त्यांनीही व्हीआयपी वाहनांचा सर्रास वापर केला. शिवाय कागदोपत्री गॅरेजमध्ये व्हीआयपी वाहनांच्या दुरुस्तीच्या नावावर आर्थिक गैरव्यवहारसुद्धा केला, असा आरोप जीटीएस वाहन चालक संघटनेने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com