Maharashtra Politics
ESakal
डोंबिवली : भाजप-शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली फोडाफोडीची स्पर्धा शिगेला पोहोचली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शनिवारी एका कार्यक्रमात एकत्र आले. मात्र ‘युतीतील एकजूट’ असा संदेश उभा राहायला हवा असताना उलट या दोघांतील कोल्ड वॉर पुन्हा एकदा उघडपणे दिसून आला.