

Thakurli Shinde Shivsena Workers Join BJP
ESakal
डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. ज्यामध्ये शिंदे शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला असून याप्रकरणी राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. तसेच या पक्षप्रवेशामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.