
Kharghar: वाहनचालकाला जाब विचारल्याने सीआयएसएफच्या दहा ते पंधरा जवानांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखासह दोघांना मारहाण केली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर २० मध्ये राहणारे डॉ. श्रीनाथ परब, मित्र जयेश, भाऊ प्रसादसह रात्री दहाच्या सुमारास कारने घरी परतत होते. खारघरमधील प्रणाम हॉटेल समोर सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवरील चालकाने डाव्या बाजूला अचानक गाडी वळवली.