
Eknath shinde on thane metro 4 trial run
ESakal
ठाणे : ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाकडून मेट्रो मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे. मागील कित्येक दिवसांपासून ठाणेकरांचे मेट्रोच्या कामाकडे लक्ष लागले होते. त्यानंतर आता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो ४ आणि ४-अ वरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे.