
Eknath Shinde
ESakal
मुंबई : नुकतेच ठाणे मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेच्या ट्रायल रनची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामुळे ठाणेकरांसाठी आजचा दिवस (सोमवार ता. २२) आनंदाचा असल्याचे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच या मेट्रो सेवेमुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून याचा चांगलाच फायदा नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.