अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Eknath Shinde Sanjay Raut : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अचानक एकमेकांच्या समोर आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी गेले असताना दोघांची भेट झाली.
Eknath Shinde Sanjay Raut Sudden Meeting

Eknath Shinde Sanjay Raut Sudden Meeting

Esakal

Updated on

राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदान अवघ्या ८ दिवसांवर आले असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली जात आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक समोरासमोर आले. शिवसेना फुटीनंतर एकमेकांवर कठोर शब्दात टीका करणारे दोघेही आमने-सामने आल्याचे फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com