
मुंबई : राज्यातील सरकारी, जिल्हा परिषदेच्या तब्बल १८,००० शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. मात्र, या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाली तरी ती कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले. तसेच काही भागांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत असून, त्या शिक्षकांचे योग्य समायोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.