BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Shinde Sena Plans ‘Mission Tiger’: महायुतीच्या सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे पहिले अडीच वर्षे महापौरपद राहणार असले, तरी त्यानंतर हे पद शिंदेसेनेकडे देण्यासाठी पडद्यामागे रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
Shinde Sena Plans ‘Mission Tiger’ to Strengthen Numbers in Mumbai BMC

Shinde Sena Plans ‘Mission Tiger’ to Strengthen Numbers in Mumbai BMC

ESakal

Updated on

महापौर पदावरून महायुतीच्या गोटात पडद्यामागून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सध्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या रितू तावडे महापौर आणि शिंदे सेनेचे संजय घाडी उपमहापौर पदावर विराजमान आहेत. पहिली अडीच वर्षे महापौरपद भाजपकडे राहणार असून पुढील सव्वावर्षासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिवसेनेने आता महापालिकेत ‘मिशन टायगर’चे प्रयत्न सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com