
शहापूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट पक्षाचे शहापूर शहराध्यक्ष व नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी त्यांच्या शेकडो समर्थकासह शिंदे गट शिवसेनेत ठाणे येथील आनंदआश्रम येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला.
विजय भगत यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केल्याने शहापूर नगरपंचायत मध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी जिप व पंस च्या निवडणुकीत फायदा होणार असून शहापूर तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचे शिवसेनानेते प्रकाश पाटील व जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी यावेळी सांगितले.