Eknath Shinde: ठाकरेंना पुन्हा खिंडार; राज्यभरातीत स्थानिक नेत्यांनी घेतला शिवसेनेत प्रवेश
Latest Maharashtra News: राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गांतील नागरिकांनी शिवसेनेला भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे ५७ आणि तीन सहयोगी पक्षांचे असे ६० उमेदवार निवडून आले.
Eknath shinde shivsena uddhav thackeray Local Leaders Across Maharashtra Join Forces thane mumbai sakal
सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ५ : आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची, असे वक्तव्य करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत जनतेनेच दाखवून दिले खरी शिवसेना कुणाची आहे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.