

ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपने आपल्या विजयाचे घोडे उधळले आहेत. सहापैकी नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवत कमळ फुलवले आहे. उल्हासनगरमध्येही सत्तेच्या जवळ भाजप आहे. तर दुसरीकडे ठाण्यात युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक ७५ नगरसेवक निवडून आणले आहेत; पण भाईंदरचा भाजपच्या ७८ नगरसेवकांचा रेकॉर्ड मोडता आला नाही.