
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक्स खातं हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट उपमुख्यमंत्र्यांचंच खातं हॅक झाल्यानं खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा सायबर हल्ले आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचं एक्स खातं हॅक करून त्यावर हॅकर्सनी पाकिस्तान आणि तुर्कीचे व्हिडीओ पोस्ट केले होते.