

Two voter ID cards of same person
ESakal
डोंबिवली : लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेतील काटेकोरपणाची हमी देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. निवृत्त पोलीस अधिकारी अशोक कुलकर्णी यांच्या पत्नींच्या नावे एकच नाव व पत्ता असलेली दोन मतदान ओळखपत्र पोस्टाने घरपोच पोहोचली आहेत. विशेष म्हणजे दोन्ही कार्डांवर नाव, पत्ता, मतदार ओळख क्रमांकासह सर्व माहिती अगदी तंतोतंत एकसारखी असून, केवळ फोटो आणि कार्डचा नंबर वेगळा असल्याचे उघड झाले आहे.