Electric Bus Burn : चार्जिंगसाठी उभी असलेली मालवणी आगारात बस पेटली

मालवणी बस आगारात चार्जिंगसाठी उभ्या असलेल्या बसने शुक्रवारी सकाळी पाच वाजता पेट घेतला.
electric bus fire
electric bus fireSakal

मुंबई - मालवणी बस आगारात चार्जिंगसाठी उभ्या असलेल्या बसने शुक्रवारी सकाळी पाच वाजता पेट घेतला. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी मालवणी बस आगारातील ही दुसरी घटना आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झालेल्या भाडेतत्त्वावरील बसेसना वारंवार होणाऱ्या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. मात्र भाडेतत्त्वावरील बसेसना वारंवार होणाऱ्या अपघातामुळे बसच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. टाटा मोटर्स कंपनीची बस नंबर ६४०० एम एच ०१ डीआर ६२६० भाडेतत्त्वावरील बस शुक्रवारी सकाळी ५ वाजता मालवणी बस डेपोत चार्जिंगसाठी उभी होती.

यावेळी अचानक बसने पेट घेतला. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मालवणी बस डेपोतील ही दुसरी घटना आहे.

दरम्यान, टाटा मोटर्स लिमिटेड ( टी एम एल ) या कंत्राटदाराची ही मिनी वातानुकूलित इलेक्ट्रीक बस ६३४७ (एम एच ०२ - डीआर १८१०) बस क्रमांक ए ३५९ वर मालवणी आगार ते हिरानंदानी बस स्थानक ( पवई ) येथे जाऊन दुपारी १ वाजता असता आली.

मालवणी बस आगारात बस उभी असताना बसने पेट घेतला होता. १६ जून २०२३ रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर शुक्रवार १ सप्टेंबर २०२३ रोजी ही दुसरी घटना घडल्याने भाडेतत्त्वावरील बसेसवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com