प्राथमिक शाळा सुरू होणार ? राजेश टोपे यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

प्राथमिक शाळा सुरू होणार ? राजेश टोपे यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात जवळपास सर्वच गोष्टी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही वर्गात बोलावण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्स अभ्यास करीत होते. लहान मुलांसाठी अटी शर्थी पाळून शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही,उद्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होणार असून निर्यात होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शाळा,महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत. परंतु पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा अद्याप सुरू झालेल्या नाही.विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी त्यांचे लसीकरण होईपर्यंत अटी शर्थी पाळून शाळा सुरू करता येऊ शकतात. तसेच 12 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे याबाबत टास्क फोर्सने सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत असे ही टोपे पुढे म्हणाले.

अमेरिका,जर्मनी,ऑस्ट्रेलिया देशात डेल्टा व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पहायला मिळतोय. त्यापार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील केसेसकडे आपण बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना केसेसमध्ये अशीच स्थिती राहिली किंवा केसेस कमी झाल्यास निर्बंध आणखी शिथिल केले जातील अशी शक्यता ही त्यांनी वर्तवली.

हेही वाचा: जळगाव : वैज्ञानिक होण्यासाठी मोठ्या शिक्षणाची गरज नाही

जगातील मोठ्या देशांमध्ये तिसरी लाट घातक ठरतेय. त्यामुळे आपण सर्वांनी याबाबत सावधगीरी बाळगळी पाहिजे. मात्र आपल्याकडे लग्नाच्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी, राजकीय सभांमध्ये गर्दी वाढतेय. लोकांमध्ये बिनधास्तपणा वाढतोय. यावर नियंत्रण ठेवणे तसेच लोकांनी त्रीसूत्री चे पालन करणे गरजेचे आहे असेही टोपे यांनी म्हटले आहे.

loading image
go to top