

11 people food poisoning after eating cake
Esakal
मुंबई : ऑनलाइन मागवलेले अन्नपदार्थ किंवा हॉटेलमधील जेवणात झुरळ, अळ्या, किडे आढळल्याच्या घटना घडतात. नकळतपणे ते अन्नपदार्थ खाताच नागरिकांना पोटदुखी, उलट्या किंवा विषबाधा होत असल्याचे समोर येते. अशीच एक घटना नालासोपारा येथे घडल्याचे समोर आले आहे. वाढदिवसाचा केक खाल्ल्याने ११ जणांना गंभीर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.