अकरावीचेही ऑनलाईन वर्ग सुरू होणार;  2 नोव्हेंबरपासून नोंदणी तर तासिकांचे वेळापत्रक लवकरच 

तेजस वाघमारे
Saturday, 31 October 2020

मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल? यावर प्रश्‍नचिन्ह असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल? यावर प्रश्‍नचिन्ह असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 नोव्हेंबरपासून अकरावी ऑनलाईन शिक्षणाच्या नोंदणीस सुरुवात होणार असून, तासिकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

मॅटचे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश

शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेश फेरीचे प्रवेश झाल्यानंतर मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली; परंतु अकरावीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. अखेर शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. 

वेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला

इच्छुक शाखेसाठी नोंदणी 
अकरावी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून भरणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी ज्या शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक आहे. त्या शाखेसाठी त्याने नावनोंदणी करायची असून, ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक व आवश्‍यक तपशील विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर मिळणार आहे. नावनोंदणीसाठी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh ही लिंक उपलब्ध आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh online class registration from November 2