एल्गार परिषद : गौतम नवलखा यांची दिल्लीतून मुंबईतील 'या' तुरुंगात रवानगी

gautam navlakha
gautam navlakha

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांना मंगळवारी दिल्लीहून मुंबईतील तळोजा तुरुंगात हलवण्यात आले. तुरुंगात हलवण्यात येण्यापूर्वी त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल.

नवलखा शरण आल्यानंतर 14 एप्रिलला त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले होते, मात्र लॉकडाऊन लागू झाल्याने त्यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले नव्हते. 

परंतु जवळपास एक महिन्यानंतर सरकारने नवलखा यांना शहरात आणण्याची परवानगी देत प्रवासाचे नियम शिथिल केले. मंगळवारी त्यांना लगेचच मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर तेथून त्यांना तळोजा तुरुंगात पाठवण्यात आले. आता नवलखांना 22 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Elgar Parishad: Departure of Gautam Navlakha from Delhi to Jail in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com