

Belapur slum dwellers free housing
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टीधारकांना आता त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. पात्र झोपडपट्टीधारकांना मोफत घरे दिली जातील, तर अपात्र झोपडपट्टीधारकांना अडीच लाख रुपयांमध्ये घरे दिली जातील. यासाठी गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी झोपडपट्टीधारकांचे तातडीने सर्वेक्षण आणि बायोमेट्रिक्स करण्याचे आदेश एका बैठकीत दिले आहेत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी ही माहिती दिली.