Abu Azmi : औरंगजेब बादशाह वाईट माणूस नव्हता - अबू आझमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abu Azmi

Abu Azmi : औरंगजेब बादशाह वाईट माणूस नव्हता - अबू आझमी

मुंबई : औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल, असं विधान समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. हिंदूंवर हल्ले होत असतील तर मुस्लीमांवरही हल्ले होत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Emperor Aurangzeb was not a bad man says SP MLA Abu Azmi)

हेही वाचा: Jagdeep Dhankhad : इंग्रजी बोलणारा गावातला पहिला मुलगा बनला आज उपराष्ट्रपती

आझमी म्हणाले, औरंगजेब बादशाह वाईट माणूस नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. जर त्यांचा खरा इतिहास समोर आला तर हिंदू नाराज होणार नाहीत. देशभरात अनेकांची नाव औरंगजेब आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावं मुस्लीम व्यक्तीच्या नावावरुन आहेत. या जिल्ह्यांची नाव बदलल्यानं कोणाला नोकऱ्या मिळणार नाहीत. महागाई कमी होणार नाही. जर ही नाव बदलून तरुणांना नोकऱ्या मिळणार असतील तर मी या बदलाचं स्वागत करेन.

हेही वाचा: राज्यात बारा हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; नव्या रुग्णांची पडतेय भर

दरम्यान, कर्जतमध्ये एका तरुणाची अमरावतीतील उमेश कोल्हे प्रकरणाप्रमाणं हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवू असंही त्यांनी यामध्ये म्हटलं होतं. राणेंच्या या पत्रकारपरिषदेच्या पार्श्वभूमीवर अबू आझमी हे देखील माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा: शिवसेनेतील फूट महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही - केसरकर

जर हिंदूंवर हल्ले होत आहेत तर मुस्लिमांवरही हल्ले होत आहेत. धर्माच्या नावावर भांडण लावण्याचं आणि भडकवण्याचं काम नारायण राणे यांचे पुत्र करत आहेत. देशातील महागाई, बेरोजगारी यावर बोलण्याऐवजी राणे हिंदुत्वाचं राजकारण करत आहेत. यामुळं देशाची श्रीलंकेप्रमाणं स्थिती होऊ नये, असंही आझमी यावेळी म्हणाले.

Web Title: Emperor Aurangzeb Was Not A Bad Man Says Sp Mla Abu Azmi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..