कोविड काळात ताणतणाव दूर करण्यासाठी मनोरंजनावर भर

कोविड काळात ताणतणाव दूर करण्यासाठी मनोरंजनावर भर

मुंबई: कोविडमुळे अनेक लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला.  तणाव दूर करण्‍यासाठी लोकांनी अनेक उपाययोजना केल्या. मात्र मुंबईसह प्रमुख शहरांतील अधिकतर लोकांनी ताण तणाव दूर करण्यासाठी मनोरंजनाचा आधार घेतला असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे. 

डॉल्‍बी लॅबोरेटरीज, इन्‍क. कंपनीने वेकफिल्‍ड रिसर्चच्या मदतीने मुंबईसह दिल्ली, चेन्‍नई,कोलकाता, हैद्राबाद आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्‍ये संशोधन केले. यामधून भारतातील ग्राहकांच्‍या मनोरंजनाच्‍या पद्धतीमध्‍ये लक्षणीय बदल झाल्‍याचे दिसून आले. नवीन घरातूनच काम करण्‍याची पद्धत आणि आराम करण्‍याच्‍या वाढत्‍या प्रमाणामुळे नवीन आणि दर्जेदार कंन्‍टेन्‍टसाठी, तसेच सर्वोत्तम डिवाइसेससाठी मागणीमध्‍ये प्रचंड वाढ झाली आहे. 

कोविडमुळे लोकांनी तणाव दूर करण्‍यासाठी मनोरंजनाचा आधार घेतला. 66 टक्‍के लोकांनी आरामासाठी या संधीचा वापर केला. तर 94 टक्‍के लोकंवर्धित व्हिडिओ आणि ऑडिओ दर्जासाठी प्रिमिअम सबस्क्रिप्‍शनवर अधिक खर्च करण्‍यास इच्‍छुक आहेत. 96 टक्‍के लोकांनी पुढील 6 महिन्‍यांमध्‍ये त्‍यांचे मनोरंजन साहित्‍य अद्ययावत करण्‍याचे नियोजन केले आहे. 94 टक्‍के लोकांनी यापूर्वी न पाहिलेले नवीन प्रकारचे कंन्‍टेन्‍ट पाहिल्याचे सांगितले. 

97टक्‍के लोकांनी कंटेन्‍टवरील त्‍यांच्‍या मासिक खर्चांमध्‍ये सरासरी 48 टक्‍क्‍यांची वाढ केली आहे. 88 टक्‍के लोकांनी त्‍यांची स्ट्रिमिंग सेवा अद्ययावत करण्‍यामध्‍ये यापूर्वीच गुंतवणूक केली आहे. 96 टक्‍के लोकं त्‍यांचे मनोरंजन साहित्‍य अद्ययावत करण्‍याचे नियोजन करत आहेत. साहित्‍य अद्ययावत करण्‍यामध्‍ये सर्वोत्तम मोबाइल डिवाइसेसचा समावेश आहे. कामासाठी व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंगची आवश्‍यकता असल्‍यामुळे अनेकजण वैयक्तिक उद्देशांसाठी तंत्रज्ञान 'खरेदी' करत आहेत. 92 टक्‍के लोकं सामाजिक उद्देशांसाठी वर्क व्हिडिओ अॅप्‍लिकेशन्‍सचा उपयोग करत आहेत.

संशोधनातून  मिळालेल्या माहितीनुसार, 29 टक्‍के लोकांचे स्मार्टफोन त्‍यांचे प्रमुख मनोरंजन डिवाईस आहे. यानंतर 22 टक्‍के लोकांनी टेलिव्हिजनला, तर 20 टक्‍के  लोकांनी कम्‍प्‍युटरला प्राधान्‍य दिले. तर काही ग्राहकांनी चित्रपट आणि टीव्‍ही मालिका पाहण्‍यामध्ये रूची दाखवली आहे. लॉकडाऊनमुळे मनोरंजनासाठी खूप वेळ मिळाल्याने 95 टक्के ग्राहकांनी नवीन कन्‍टेन्‍ट पाहिले. लोकप्रिय नवीन कंन्‍टेन्‍ट (50 टक्‍के), त्‍यानंतर कॉमेडी (48 टक्‍के), व्हिडिओ गेम स्ट्रिमिंग (46 टक्‍के) आणि डीआयवाय व्हिडिओज (45 टक्‍के) अधिक पसंती दिली.   

कोरोना संकटामुळे वर्षभरात अनेक आव्‍हाने असताना देखील या संशोधनाने आपल्‍यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेल्‍यांसोबत एकत्र आणणा-या मनोरंजनाच्‍या शक्‍तीला दाखवले आहे, असे डॉल्‍बी लॅबोरेटरीजच्‍या इमर्जिंग मार्केट्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक पंकज केडिया म्हणाले.

उच्‍च दर्जाचा आवाज आणि व्हिज्‍युअल अनुभवाचा मोठा परिणाम दिसून आला. यामुळे उत्साह तसेच मनोरंजनाचा अनुभव वाढतो. सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक काळादरम्‍यान लोकांना एकमेकांशी उत्तमपणे संलग्‍न होण्‍यामध्‍ये मदत झाली असल्याचे वेकफिल्‍ड रिसर्चचे वरिष्‍ठ भागीदार नॅथन रिचर म्‍हणाले.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Emphasis on entertainment to relieve stress during covid period

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com