लॉकडाउनमध्ये अडकून पडलेल्या इंजिनियर तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 12 May 2020

  • इंजिनिअर तरुणाची आत्महत्या
  • लॉकडाऊनमुळे घरात एकटाच अडकून राहिल्याने नैराश्य

 

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यापासून कोपरखैरणे सेक्टर-4 मधील घरामध्ये एकटाच अडकून पडलेल्या इंजिनियर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सूरज सखाराम सुर्वे (27) असे या तरुणाचे नाव आहे. 

गावी जायंचय मग, 'ई-पास' मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

सूरज सुर्वे हा तरुण मूळचा सातारा जिल्ह्यातील जावळी येथील होता. तो इंजिनियर असून ऐरोलीतील एका कंपनीत नोकरी करत होता. कोपरखैरणे सेक्टर-4 मध्ये त्याचा भाऊ व वहिनी राहण्यास होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यापूर्वी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर सूरजचा भाऊ व वहिनी गावी गेले. सूरजला त्याच्या परिचयातील कुटुंबाकडून दरदिवशी जेवण दिले जात होते. त्यामुळे जेवण करून घरात एकटाच बसायचा. घरच्यांसोबत नियमित फोनवर बोलत असला तरी, कुटुंबापासून दुरावल्याची खंत वाटत होती. घरच्यांशी भेट होत नसल्याने तो एकांतामध्ये रडत बसायचा. यातून आलेल्या नैराश्येतून त्याने मंगळवारी सकाळी गळफास घेतला. 

मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

सूरजने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत लॉकडाऊनमुळे घरी एकटाच असल्याने घर खायला उठत आहे. घरच्यांची सतत आठवण येते; परंतु त्यांची भेट होऊ शकत नाही. लॉकडाऊन अजून किती वाढेल त्याचीही खात्री नाही. यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. कोपरखैरणे पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: engineer suicide due to lockdown