मुंबई : मुंबईसह उपनगरांमधील वाहतूक कोंडी पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शहरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबईतून येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत प्रवेशबंदी असणार आहे. केवळ रात्री सहा तास प्रवेशास मुभा असेल.