लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख लोकं होम क्वॉरंटाईन

लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख लोकं होम क्वॉरंटाईन

मुंबई: कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव मुंबई शहराला बसला आहे. त्यातच लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख 20 हजार 205 लोकं होम क्वॉरंटाईन आहेत. आतापर्यंत 11 लाख 1 हजार 734 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण हे 18.22 इतके आहे.

मुंबईत आतापर्यंत 25 लाख 66 हजार 590 लोकांनी आपला होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. तर आतापर्यंत 29 लाख 88 हजार 626 बाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 24 हजार बाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून त्यात 10,545 जोखमीचे तर 13,455 अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींचा समावेश आहे. 

बाधित रूग्णांचा एकूण आकडा हा 2 लाख 775 इतका असून आतापर्यंत 1 लाख 64 हजार 883 रूग्ण बरे झालेत.  8 हजार 831 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 26 हजार 660 अॅक्टीव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात 17 हजार 308 एसिंटेमॅटीक तर 7 हजार 928 सिंटेमॅटीक रूग्णांचा समावेश आहे. 

मुंबईत आतापर्यंत झालेल्या 8 हजार 831 मृत्यूंपैकी 50 वयावरील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक असून 7 हजार 451 मृत्यू झालेल्या रूग्णांचे वय हे 50 च्या वर होते.  1 हजार 424 रूग्ण गंभीर असून त्यांच्यावर रूग्णालये तसेच कोविड काळजी केंद्रातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईतील 666 झोपडपट्टया तसेच चाळींचा कन्टेन्टमेंट झोन मध्ये समावेश असून 1 हजार 140 झोपडपट्ट्या तसेच चाळींना कन्टेन्मेन्ट झोन मधून वगळण्यात आले आहे.  10 हजार 235 इमारती कन्टेन्मेंट झोनमध्ये असून 29 हजार 742 इमारतींना वगळण्यात आलंय. आतापर्यंत 2 लाख 85 हजार 754 लोकांनी कॉल सेंटरला फोन लाऊन विविध समस्यांवर सल्ला घेतला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

--------------------

(संपादनः पूजा विचारे)

Even after six months lockdown 4 lakh people home quarantined in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com