सकारात्मक : कोरोनाच्या संकटातही 'या' योजनेतर्गंत आदिवासी क्षेत्रात मिळतोय घरपोच पोषण आहार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

आदिवासी क्षेत्रातील ८९६ अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांना महिनाभराचा एकत्रित कोरडा आहार वाटप केला जात आहे.  

ठाणे : आदिवासी भागातील मुले, गरोदर माता आणि स्तनदा माता यांना पूरक आहार मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी केंद्र सरकारची भारतरत्न ए.पी. जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना कोरोनाच्या संकटातही ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात सुरळीत सुरु आहे. आदिवासी क्षेत्रातील ८९६ अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांना महिनाभराचा एकत्रित कोरडा आहार वाटप केला जात आहे.  

मोठी बातमी : लॉकडाऊन इफेक्ट ! विकासकामं रखडल्याने कोट्यवधींचा निधी वाळ्या जाणार?

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील सहा वर्षावरील लहान बालक, गरोदर माता, स्तनदा माता यांचे सुयोग्य पोषण होण्यासाठी ही योजना लाभदायी ठरली आहे. जिल्ह्यात मुख्यतः शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यात आदिवासी क्षेत्र आहे. येथील अंगणवाडी मार्फत ही योजना राबवली जाते. एरव्ही या योजनेच्या लाभार्थ्यांना अंगणवाडी शिजवलेले अन्न दिले जाते. मात्र कोरोनामुळे अंगणवाडी केंद्र बंद असल्याने अंगणवाडी सेविका-मदतनीस किंवा बचत गटांच्या मार्फत लाभार्थाच्या घरोघरी जाऊन महिनाभराचा पोषण आहार वाटप करत आहेत. यामध्ये ६ हजार ३०० महिला व ३८ हजार बालकांचा समावेश आहे. एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये गहू,  तांदूळ, कडधान्य,  खाद्यतेल,  गूळ,  साखर,  आयोडीनयुक्त मीठ,  मसाला याचा समावेश आहे. तसेच अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना अंडी/ केळी/ स्थानिक फळे असा अतिरिक्त आहार दिला जात आहे.  

हे ही वाचा : अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

आदिवासी भागातील बालमृत्यू व कुपोषण कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाद्वारे ही योजना राबवली जात आहे. सध्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून या कठीण काळातही पोषण आहार सर्व लाभार्थापर्यंत पोहोचत आहे.                                       - संतोष भोसले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास)

Even in the crisis of corona, the diet scheme is work very well


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even in the crisis of corona, the diet scheme is work very well