esakal | "अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा" म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राम मंदिरासाठी दिला निधी

बोलून बातमी शोधा

"अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा" म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राम मंदिरासाठी दिला निधी}

देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणासाठी 1 लाख 1 रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. 

"अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा" म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राम मंदिरासाठी दिला निधी
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपला सहभाग नोंदवला.  देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणासाठी 1 लाख 1 रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. 

महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवला, अधिकृत नोटीफिकेशन जारी

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात फडणवीसांनी हा धनादेश श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांना सुपूर्द केला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या अभियानाचा 15 जानेवारी रोजी प्रारंभ झाला होता. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार असून 12 कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले आहे.

सर्वात मोठी बातमी : सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु होणार : उद्धव ठाकरे

"अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकार होतेय. यानिमित्ताने एक प्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होते आहे. आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा", असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

ex cm of maharashtra devendra fadanavis donates one lac one rupee for ram mandir