सफाळे, उसरणीमधील ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

 अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडण्याचे आदेश

सफाळे : सफाळे येथे एक तर उसरणी येथे दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.   त्यामुळे सफाळे गावाच्या ३ कि.मी. परिसराचा प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केला आहे. यामध्ये सफाळे, कर्दळ, उंबरपाडा, डोंगरीपाडा, उसरणी, दांडा, खटाळी या गावांचा समावेश आहे.

एक्सपायरी डेट संपलेल्या मालाचं करायचं काय? व्यापारांसमोर मोठं संकट

तसेच सफाळे व उसरणी गावाच्या ५ कि.मी. परिसरात बफर झोन तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार या गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवुन कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामासाठी बाहेर येणार नाही किंवा जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार सुनिल शिंदे यांनी दिल्या आहेत.

ठाणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; तुमच्या परिसराचा समावेश तर नाही ना?

प्रतिबंधीत क्षेत्राच्या नियमामुळे 15 मे पर्यंत कामगारांना बाहेर जाता किंवा आत येता येणार नाही. तसेच वरई नाका येथे योग्य तो बंदोबस्त ठेवून वसईकडे येणारी व जाणारी वाहतूक देखिल 15 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून पुर्णपणे बंद ठेवण्यात यावी, अशा सूचना सपोनि सुनिल जाधव यांना देण्यात आल्या आहेत. आज (ता.20) अत्यावश्यक सेवेचा पास नसलेल्या एका टेम्पोवर कारवाई करण्यात आली. नियमांचे काटेकोर पालन न केल्यास अधिक कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

Exit command only for urgent service in Safale and Usarani


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exit command only for urgent service in Safale and Usarani