

Mumbai Local Train Update
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेवर धावणाऱ्या १५ डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या लवकरच वाढणार आहे. ज्यामध्ये जलद आणि धीम्या दोन्ही लोकल ट्रेनचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या २७ स्थानकांच्या विस्ताराचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर, अधिक डब्यांच्या गाड्या चालवणे शक्य होईल. सुरुवातीच्या टप्प्यात, सध्या १२ डब्यांनी धावणाऱ्या सुमारे १० गाड्या १५ डब्यांमध्ये अपग्रेड केल्या जातील.