
मुंबई : गरजू व्यक्तींच्या वाढत्या आकडेवारीमुळे महापालिकेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज 6 लाखाहून अधिक जेवणाची पाकिटे तयार करण्यासाठी किमान 1 कोटी 80 लाखाचा खर्च होत आहे. तर या जेवणाचे वितरण करताना महापालिका कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत आहे.
सुरवातीला महापालिका 14 ते 15 हजार बेघरांना जेवण पुरवत होती. मात्र, नगरसेवक आणि आमदारांकडून गरजू व्यक्तींची नावे पुढे येऊ लागल्याने हा आकडा 3 लाखाच्या वर पोहोचला. या प्रत्येक व्यक्तीच्या जेवणासाठी महापालिका रोज किमान 60 रुपये खर्च करत आहे. हॉटेल्स व्यावसायिक, सेवाभावी संस्था माफक दरात जेवण बनवून देत आहेत. काही दिवसांपूर्वी 45 ठिकाणी जेवण बनवलं जात होते. मात्र, मागणी वाढू लागली तसे या संस्थानाही मोठ्या प्रमाणात जेवण बनवणे महाग पडू लागले. यामुळे संस्थांची संख्या 28 वर आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
गरजूंचे निकष ठरवण्याची मागणी
महापालिकेचे 800 अधिकारी कर्मचारी अन्न गरजू पर्यंत पोहचवण्यासाठी काम करत आहेत. त्यातील एखाद्या कर्मचार्याला जरी सुट्टी हवी असल्यास त्या बदल्यात दुसर्या कर्मचार्याची नियुक्ती करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ या कामासाठी खर्ची पडत आहे. गरजूंची संख्या वाढू लागल्याने पालिकेचा खर्च वाढण्याबरोबरच नियोजन करणेही अवघड होत असल्याची तक्रार एका अधिकार्याने केली. वरिष्ठ अधिकार्यांनी आता गरजूंचे निकष ठरवण्याची गरज असल्याचेही मत या अधिकार्याने व्यक्त केले.
Expenditure of Rs. 18 million per day for meals for more than six lakh people
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.