esakal | कोरोनाचा गणरायालाही फटका; परदेशवारीच झाली रद्द   

बोलून बातमी शोधा

ganpati bappa

कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या उद्योग-धंद्यांना ग्रहण लागले असून राज्यातल्या गणेश मूर्तिकारांचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. यातच गणेशमूर्तींची निर्यात करणाऱ्या निर्यातदारांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

कोरोनाचा गणरायालाही फटका; परदेशवारीच झाली रद्द   
sakal_logo
By
मयुरी चव्हाण काकडे

कल्याण : कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या उद्योग-धंद्यांना ग्रहण लागले असून राज्यातल्या गणेश मूर्तिकारांचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. यातच गणेशमूर्तींची निर्यात करणाऱ्या निर्यातदारांनाही याचा मोठा फटका बसला आहे. परदेशातील सर्व ऑर्डर रद्द झाल्यामुळे निर्यातदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बदलापुरातील बाप्पाच्या मूर्त्यांना इतर देशातून दरवर्षी मागणी असते. यासाठी अगोदरच परदेशातील मराठीजन मू्र्तींची नोंदणी करून ठेवतात. मात्र आता यंदा या नोंदणी केलेल्या सर्व ऑर्डर रद्द झाल्या आहेत. 

कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून अनेक देशांमध्ये सण उत्सव साजरे करता येणार नसून अनेक भारतीय हे मायदेशी परतत आहेत. बदलापूरातील निमेश जमवाड हा तरुण व्यावसायिक गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने आखाती देश, अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियात गणेशमूर्ती पाठवतो. येथील मराठीजन दरवर्षी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करतात. निमेशच्या निर्यातीच्या सगळ्या नोंदणी यंदा रद्द झाल्या असून एकही मूर्ती परदेशात गेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोठी बातमी ः Coronavirus : फक्त 2 मीटरचं सोशल डिस्टन्सिंग नाही तर वाऱ्याचा वेगही महत्वाचा, अमेरिकन संस्थेचा अहवाल

दरवर्षी निमेश तब्बल 40 लाख रुपयांच्या गणेशमूर्ती परदेशात पाठवत असतो. गेल्या 75 वर्षांपासून बदलापूर येथील आंबवणे बंधू यांचा सुप्रसिद्ध "श्री गणेश कला मंदिर" हा कारखाना आकर्षक व सुप्रसिद्ध मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, कोरोना संकटामुळे येथील बाप्पाची परदेशवारी हुकली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उल्हास आंबवणे यांनी सांगितले. 

मोठी बातमी ः अरे किती हिणवणार? भाजपच्या आंदोलनाची रोहित पवारांकडून खिल्ली


गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या असून त्या तशाच ठेवाव्या लागणार आहेत. गणेशोत्सव साजरा होईल की नाही?  असा संभ्रम सध्या परदेशातील गणेशभक्तांमध्ये आहे. त्यामुळे निर्यातदारांसोबत कारागीर, मूर्तिकार यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.
- निमेश जमवाड, गणेशमूर्तींचे निर्यातदार