दहावी, बारावीच्या पेपर तपासणीला मुदतवाढ द्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांची मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे; तर दुसरीकडे दहावी व बारावीच्या परीक्षा या नियोजित कालावधीत सुरूच ठेवण्यात आल्या असून त्यांचे पेपर तपासणीचे काम सध्या शिक्षकांकडून जोरात सुरू आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर तपासणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

गुढीपाडवाच्या बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत... 

पहिली ते आठवीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली असून दहावी परीक्षेचे दोन पेपर शिल्लक आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालयामधील शिक्षकांना घरातून काम करण्याची मुभा दिली असली, तरी दहावी व बारावीचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना शाळेत जावे लागणार आहे.

३१ मार्चपर्यंत महाराष्टातील ४ मोठी शहरं राहणार बंद-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

बारावीचे सर्व पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना 30 मार्च; तर दहावीचे पेपर तपासणीसाठी 7 एप्रिल ही अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये सर्व पेपर तपासून मंडळाकडे जमा करण्यासंदर्भात शिक्षकांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. दहावी व बारावीचे पेपर हे तपासण्यासाठी घरी नेता येऊ शकत नसल्याने सध्याच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांना जीव धोक्‍यात घालून शाळेत यावे लागत आहे. 

मनसेनंही घेतला कोरोनाचा धस्का,गुढीपाडवा मेळावा केला रद्द 

अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम! 
भविष्यात परिस्थिती हाताबाहेर गेल्यास मोठे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे दहावी व बारावीचे पेपर तपासणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाणार आहे. त्यामुळे निकाल काही दिवस विलंबाने लागल्यास याचा कोणताही परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाही. त्यामुळे पेपर तपासणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

Extend the checking time of paper exam for Class X, XII


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extend the checking time of paper exam for Class X, XII