esakal | शिवभोजन थाळीची मुदतवाढ...
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

शिवभोजन थाळीची मुदतवाढ...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सानपाडा : कोविड (Covid) काळात लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे गरीब आणि गरजू नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये म्हणून राज्य शासनाने शिवभोजन (Shiv Bhojan) थाळी १४ जुलैपर्यंत निःशुल्क केली होती. त्‍यात मुदतवाढ करीत १४ सप्टेंबरपर्यत (September) शिवभोजन थाळी निःशुल्क ठेवल्याने गरजू नागरिकांच्या पोटाला आधार मिळणार आहे.

राज्य राज्य शासनातर्फे अल्पदरात सुरू असलेली शिवभोजन थाळी गरिबांसाठी आधार ठरली आहे. आधी ही थाळी सकाळी १२ ते २ या वेळेत १० रुपयांत मिळत होती व यासाठी ५० ताटांची मर्यादा होती व त्यामुळे गरजूंना पोटभर जेवण मिळत आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केल्याने राज्य शासनातर्फे ही मर्यादा वाढवून २०० वर नेण्यात आली व वेळ ही वाढवण्यात आली. त्याचबरोबर १० रुपयांवरून थाळीचे दर ५ रुपये करण्यात आली.

हेही वाचा: लॉकडाऊन आवडे 'ठाकरे' सरकारला- राज ठाकरे

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या व गोरगरीब जनतेच्या रोजगारावर मोठा परिणाम होऊन त्यांची परवड झाली. जेवणाअभावी त्‍यांचे हालअपेष्टा होऊ नये म्हणून सरकारने १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन थाळी मोफत केली. त्यामुळे गरजू लोकांच्या पोटाला मोठा आधार मिळाला. मोफत थाळीचा कालावधी १४ जुलैपर्यत होता. मात्र त्यात आता आणखी दोन महिने वाढ केली असून १४ सप्टेंबरपर्यंत ही शिवभोजन थाळी मोफत मिळणार असल्‍याचे राज्य सरकारकडून सूचित करण्यात आले आहे.

loading image
go to top