ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत देणाऱ्या एसटीच्या योजनेला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात 33 टक्के ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाशी निगडित स्मार्ट कार्ड  योजना एसटी महामंडळाने यापूर्वीच सुरू केली आहे.

मुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

हे ही वाचा : अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात 33 टक्के ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाशी निगडित स्मार्ट कार्ड योजना एसटी महामंडळाने यापूर्वीच सुरू केली आहे.

नक्की वाचा : म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

त्यानुसार प्रत्येक आगारात ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने या योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे एसटी बससेवा सुरू असलेल्या भागांमध्ये प्रवाशांना जुन्या घोषणेनुसार सवलती लागू असतील, असे परब यांनी संगितले.

Extension of ST smart card scheme for giving discounts to senior citizens

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension of ST's smart card scheme for giving discounts to senior citizens