सुरक्षा रक्षकांवर कोरोनाची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020


सिडकोचे आरोग्य कर्मचारी गैरहजर, उलव्यातील नागरिकांमध्ये नाराजी 
किंवा 
सर्वेक्षणाला सिडकोचे आरोग्य कर्मचारी गैरहजर 
उलव्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर; नागरिकांमध्ये नाराजी 
नवी मुंबई : उलवे नोडमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यानंतर सेक्‍टर 20 मध्ये सिडकोमार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे; मात्र सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागातील कर्मचारीच हजर राहत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, सिडको प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना या कामी जुंपले आहे. 

नवी मुंबई : उलवे नोडमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यानंतर सेक्‍टर 20 मध्ये सिडकोमार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे; मात्र सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागातील कर्मचारीच हजर राहत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, सिडको प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना या कामी जुंपले आहे. 

उलव्यात एकाच कुटुंबातील चौघे कोरोनाबाधित सापडले. या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने सेक्‍टर 20 मध्ये सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. त्याकरता आरोग्य विभागातील तीन आरोग्य अधिकाऱ्यांसह 25 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे; मात्र केवळ 10 ते 15 कर्मचारीच उपस्थित राहत आहेत. सर्वेक्षणाचे काम करण्यास कर्मचारी तयार नसल्याने सुरक्षा रक्षकांना सर्वेक्षणादरम्यान इतर कर्मचाऱ्यांसोबत राहून आरोग्यविषयक नोंदी करण्यास सांगितले जात आहे. याविषयी सुरक्षा विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले की, आरोग्य खात्यातील कर्मचारी कामावर येत नसल्याने सर्वेक्षणादरम्यान नोंदी ठेवण्याची जबाबदारी सुरक्षा विभागाला दिल्याचे सांगण्यात आले. 

सावधान... वाचा हेही : सागरी मार्गाने लॉकडाऊन मोडणार्!यांवर पोलिसांची पाळत

सर्वेक्षणाला सिडकोचे सुरक्षा कर्मचारीही येत नसल्याने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ठाणे, बृहन्मुंबई व रायगड मंडळाच्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांची नेमणूक या कामी करण्यात आली आहे. मात्र त्यांना हातमोजे, मास्क अशी सुरक्षा साधनेही देण्यात आलेली नाहीत. 

दारू काय काय करायला लावते बघा, शेवटी पोलिसांनी पकडलंच...

केवळ सुरक्षा देण्याचे आदेश 
ज्या पत्राद्वारे सुरक्षा रक्षकांना आदेश देण्यात आले आहेत, त्यावर सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे, घरोघरी भेट देताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितलेली नागरिकांची आरोग्यविषयक माहिती फॉर्मवर नमूद करायचे आहे. 

मोठी बातमी : पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी, वय होतं अवघे...

आरोग्य अधिकाऱ्यांची पाठराखण 
सुरक्षा रक्षकांना सर्वेक्षणाचे काम नाही. सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांनी मात्र सुरक्षा रक्षकांना पोलिसांसोबत राहण्यास सांगितले आहे. त्यांना सर्वेक्षणाचे काम लावलेले नाही, असा निर्वाळा दिला. तसेच सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागातील नेमणूक केलेले सर्व कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extra Responsibility of corona serve