

Navi Mumbai Fake FDA Officers Gang Busted
ESakal
नवी मुंबई : एफडीएकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच अस्वच्छता असणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई केली जात आहे. याच कारवाईचा गैरफायदा घेत बोगस एफडीए अधिकारी बनून एका टोळीने परप्रांतीयांच्या पान टपऱ्यांना टार्गेट केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर या बोगस एफडीए अधिकाऱ्यांनी पान टपरी वाल्यांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे.