फेक TRP घोटाळा प्रकरणः रिपब्लिकची मुंबई उच्च न्यायालयात धाव

फेक TRP घोटाळा प्रकरणः रिपब्लिकची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई: टीआरपी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत सीबीआयकडे तपास देण्याची मागणी केली आहे. याचिकेवर आता उद्या, सोमवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

एआरजी आऊटलिअर मिडिया प्रा. लि आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ही याचिका करण्यात आली आहे.  मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे तपास होण्यासाठी सीबीआयकडे प्रकरण सोपवावे, अशी मागणी ही याचिकेत करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयात प्रथम याचिका करण्यास सांगितले होते.

याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या पीठाने गुरुवारी कंपनीला फटकारले होते. तुमच्या वरळीमधील कार्यालयापासून मुंबई उच्च न्यायालय अगदीच जवळ आहे. त्यामुळे उच्च न्यायालयावर विश्वास ठेवा आणि तिथे आधी दाद मागा, अशा शब्दांत पीठाने सुनावले होते.  तसेच उच्च न्यायालयात याचिका करण्याची मुभा देऊन कंपनीची याचिका फेटाळली होती.

फेक टीआरपी मिळवून रिपब्लिक टीव्ही सह अन्य दोन चॅनेलने फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप पोलिसांनी केला आहे. रिपब्लिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यामुळे तातडीने याचिका करण्यात आली आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Fake trp case arnab goswami petition filed bombay high court behalf of Republic TV

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com