Dombivli News : धक्कादायक! मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना व आजीला बेदम मारहाण

मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना व आजीला बेदम मारहाण झाल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. मुलांच्या आईकडील मंडळींनी ही मारहाण केली असून याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
family dispute father and grandmother beaten over meeting children police dombivli crime
family dispute father and grandmother beaten over meeting children police dombivli crimeSakal

डोंबिवली : मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना व आजीला बेदम मारहाण झाल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. मुलांच्या आईकडील मंडळींनी ही मारहाण केली असून याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान समाज माध्यमावर काही व्हिडीओ व्हायरल झाले असून त्याअनुषंगाने देखील पोलीस तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले. डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात राहणारे फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद आहेत.

पत्नी मुलांसोबत वेगळी रहात आहे. बुधवारी सायंकाळी मूल हे आजी आजोबांकडे आली होती. फिर्यादी यांच्या आईने मुले आले असल्याची बाब त्यांना सांगितली. त्यावर फिर्यादी हे मुलांना भेटण्यासाठी पत्नीच्या आईच्या घरी गेले.

यावेळी त्याच्या सासूने तू इथे का येतो अशी विचारणा केली. त्यांची बोलाचाली सुरू असताना फिर्यादी यांची आई तेथे आली. दरम्यान दोन्ही विहिनीची वादावादी झाली. पत्नीच्या आईने फिर्यादी यांच्या आईला मारहाण करत त्यांच्या अंगावरील कपडे फाडले.

नंतर फिर्यादीचे दोन्ही मेहुणे तेथे आले. त्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या ज्येष्ठ आईला जबर मारहाण झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. समाज माध्यमावर या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याअनुषंगाने देखील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिते यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com