अरे देवा! कोरोना रुग्णांच्या हाती थोपलं तब्बल 18 लाखांचं बिल; वाचा बातमी सविस्तर

अरे देवा! कोरोना रुग्णांच्या हाती थोपलं तब्बल 18 लाखांचं बिल; वाचा बातमी सविस्तर


मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसचा उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयांतून अव्वाच्या सव्वा बिल देत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक आता घाटकोपरमधले रिअल इस्टेट एजंटना खासगी रुग्णालयानं अव्वाच्या सव्वा बिल फाडल्याची घटना घडली आहे. घाटकोपर येथील एका रिअल इस्टेट एजंटवर ठाण्यातल्या खासगी रुग्णालयानं तब्बल 18 लाख रुपयांचं बिल आकारलं आहे. 

घाटकोपरच्या या कुटुंबियांनी कोविड-19 वर रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर रुग्णालयानं 18 लाखांचं बिल दिल्यानं त्यांना आपल्या मित्रांकडून जवळपास 9 लाखांचं कर्ज घ्यावं लागलं आहे. या कुटुंबांचा 9 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा होता. मात्र ठाण्यातल्या या रुग्णालयानं त्यांच्याकडे 18 लाख रुपयांचं बिल थोपवलं. 

असल्फा घाटकोपर पश्चिम येथील 39 वर्षीय रिअल इस्टेट एजंटला अन्नदान करत असताना संसर्ग झाल्याचा संशय आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबियातील त्यांची 65 वर्षांची आई, त्यांची पत्नी, सहा वर्षांच्या मुलगी, पत्नीची बहिण, तिचा मुलगा आणि त्यांची स्वतःची बहिण आणि पुतणे या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं. इस्टेट एजंट आणि त्यांची पत्नी वगळता कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. 

इस्टेट एजंटला भूक न लागणं आणि थकवा यासारखे कोविड-19 चे लक्षणं असल्याचं जाणवलं. त्यांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांच्या पत्नीची चाचणी पॉझिटिव्ह आली. पत्नीची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कोविड-19ची टेस्ट केली. ती टेस्ट त्यांची पॉझिटिव्ह आली. इस्टेट एजंटनी प्रत्येक टेस्टसाठी 4,500 रुपये खर्च केले. मुंबईतल्या खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना कुटुंबियांनी तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. आम्हाला सरकारी रूग्णालयात दाखल व्हायचं नव्हतं आणि आम्हाला एकत्र राहायचं होतं, असं त्यांनी सांगितलं. रुग्णालयात त्यानं कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला प्रवेशासाठी ठेव म्हणून 50,000 रुपये दिले. 

त्यांच्या चार नातलगांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर 11व्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात 3 लाख रुपये दिले. त्यानंतर 17 व्या दिवशी इतर चौघांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी २ लाख रुपये रोख दिले आणि बाकीची रक्कम माझ्या--लाख रुपयांच्या मेडिक्लेम पॉलिसीमधून रद्द करण्यात आली. आम्ही राज्य सरकारनं ताब्यात घेतलेल्या हॉटेलमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं. पालिकेच्या सुविधेनुसार त्यांच्याकडून केवळ खोलीसाठी शुल्क आकारल जात होते आणि सात दिवसानंतर त्यांना सोडण्यात आलं.

रूग्णालयाने आमच्यासाठी केवळ औषधांसाठी 70 हजार रुपये आणि पीपीई किट्ससाठी 18 हजार रुपये प्रती शुल्क आकारले असल्याचं रिअल इस्टेट एजंटनं सांगितलं जे आता बरे झालेत. या कुटुंबाला मित्रांकडून पैसे घ्यावे लागले आणि  परतफेड करण्यात त्याला बराच काळ लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

असल्फाला लागलेल्या आगीमुळे मला यापूर्वी नुकसान झाले आहे आणि आता कोरोना व्हायरसच्या उपचाराचे पैसे देण्यासाठी कर्ज काढावं लागणार आहे. हे कर्ज काढण्यासाठी मला दागिने विकावे लागणार असल्याचंही ते म्हणालेत. मला माहित नाही की मी कोरोनामुक्त झाल्याचा आनंद साजरा करावा की घेतलेल्या कर्जामुळे रडावे, अशी प्रतिक्रिया रिअल इस्टेट एजंटनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com