
मुंबई : झोपत नाही म्हणून पाच वर्षांच्या चिमुकलीला पित्याने बेदम मारहाण केलीच; पण चेहेऱ्यावर पेटत्या सिगारेटचे चटकेही दिले. मारहाण अशीच सुरू राहिली तर चिमुकलीचा जीव जाईल, हे जाणून शेजारील अल्पवयीन तरुणीने या प्रसंगाचा व्हिडिओ तयार करून तो एका प्राणिमित्रामार्फत पोलिसांपर्यंत पोहोचवला.