मुलीला झोपेतून उठवताना चुकीचा स्पर्श, बापानं केली वृद्धाची हत्या

Mumbai Crime news
Mumbai Crime newsesakal

मुंबई : मुलीची छेड काढल्याचा राग अनावर झाल्यानं बापानं वयोवृद्ध आचाऱ्याची हत्या (Mumbai Crime) केल्याची घटना मानखुर्द (Mankhurd) परिसरात घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात (Mankhurd Police Thane) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

Mumbai Crime news
अंबरनाथमध्ये नवीन वर्षाच्या रात्रीच तरुणाची दगडाने ठेचून हत्या

अब्दुल खलील शेख (६९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते व त्यांची पत्नी आरोपी सलीम जाफर मो. अख्तर आलम उर्फ सलीम यांच्याकडे आचारी म्हणून काम करत होते. आरोपी सलीमची १२ वर्षीय मुलगी मुलूंड साठेनगर येथील घरी झोपली असताना अब्दुलने तिला उठवले. तिला उठवताना चुकीचा स्पर्श केला. ही बाब तिने वडील सलीम जाफरला सांगितली. मुलीची छेड काढल्याचा राग अनावर झाला. त्यामुळे आरोपी सलीमने अब्दुल यांना पट्ट्याने आणि काठीने जबर मारहाण केली. यामध्ये अब्दुल गंभीर झाले होते. काहीवेळातच त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर पत्नीसोबत मिळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी दोघांनीही मिळून मानखुर्द लिंक रोड येथील साठे नगरात अब्दुल यांचा मृतदेह फेकून पळ काढला. पोलिसांना मृतदेह दिसल्यामुळे गुन्हा नोंदवत त्यांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी आरोपी व त्याची पत्नी या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनीही हत्या केल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com