

FDA Action In Bhiwandi
ESakal
भिवंडी : मुदतबाह्य, खराब आणि उंदरांनी दूषित केलेले खाद्यपदार्थ नष्ट न करता त्यांची पुनर्विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत उघड झाला. याप्रकरणी ३३ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. संबंधित कंपन्यांचे अधिकारी, गोदाम व्यवस्थापक आणि पुरवठादारांसह ११ जणांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.