थांबा ! तुम्ही बाजारातून आणलेलं हॅन्ड सॅनिटायझर डुप्लिकेट तर नाहीना ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई - जगभरात कोरोनाची दहशत आहे. कोरोनावर अजूनही कोणतं औषध शोधण्यात आलेलं नाही आणि म्हणूनच लोकांमध्ये कोरोनाची जास्त भीती आहे. अशात WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटकडून कोरोनाला 'महावारी' म्हणून घोषित करण्यात आलंय. WHO कडून आपण स्वतः कशी काळजी घ्यावी याचे काही निर्देश देण्यात आलेत. यामध्ये आपले हात 'हॅन्ड सॅनिटायझर'ने वारंवार साफ केल्यास आपण कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकतो असं म्हटलंय.

मोठी बातमी - अमित शहा यांना जोतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल वाटतेय 'ही' भीती

अशात कोरोनाच्या प्रचंड दहशतीमुळे अनेकांनी बाजारातून हॅन्ड सॅनिटायझर्स विकत घेतल्याने बाजारात सॅनिटायझरचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. अशातही काही समाज कंटकांनी या परिस्थितीचा फायदा उचलत बाजारात बनावटी हॅन्ड सॅनिटायझर आणलेत.

मुंबईतून लाखोंचा बनावट हॅन्ड सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आलाय. मुंबईत FDA कडून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात यामध्ये हा बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आलाय. मुंबईत या बनावट हॅन्ड सॅनिटायझरच्या बाटल्या तब्ब्ल दीडशे दोनशे रुपयांना विकल्या जातायत. मोठाल्या ड्रम्समध्ये निकृष्ट दर्जाचा कच्चा माल साठवून हे बनावट हॅन्ड सॅनिटायझर्स बनवण्यात येतायत. या पैकी अनेक सॅनिटायझर बाटल्यांमध्ये केवळ पाणी असल्याचं आता समोर आलंय.

घृणास्पद ! आपल्या मित्रांना 'त्याने' दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी...

मुंबईतील वाकोल्यातील संस्कार आयुर्वेद या कंपनीवर FDA ने छापा मारत कारवाई केलीये ज्यामधेय FDA ने लाखोंचा माल जप्त केलाय.  

fda raids sanskar aayurveda in mumbai vakola area seized fake hand sanitizer worth lacs

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fda raids sanskar aayurveda in mumbai vakola area seized fake hand sanitizer worth lacs