esakal | अमित शहा यांना जोतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल वाटतेय 'ही' भीती
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा यांना जोतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल वाटतेय 'ही' भीती

अमित शहा यांना जोतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल वाटतेय 'ही' भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काल भाजपमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेशमधल्या २१ आमदारांनीही त्यांच्यासोबत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मात्र असलं तरी भाजपनं अजूनही मध्यप्रदेशमध्ये सत्तास्थापनेचा दावा केला नाहीये. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदेही अजित पवारांसारखेच वागतील का अशी भीती भाजपला असण्याची शक्यता आहे. 

भीषण ! परदेशात वापरलेले N९५ मास्क धुवून विक्रीसाठी  भिवंडीच्या गोदामात..... 

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता. भल्या पहाटे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाची शपथ होती. मात्र काही तासांमध्येच अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा  दिला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. अजित पवारांनी युटर्न घेतल्यामुळे अवघ्या  ८० तासांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. भाजप अजूनही या धक्क्यातून सावरू शकलं नाहीये. 

सत्ताधारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य समर्थक २१ आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. आता मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार अल्पमतात आहे. ज्योतिरादित्य यांनी अधिकृतपणे पक्षात केला तरी मध्य प्रदेशातल्या भाजपनं अजूनही सत्तास्थापनेचा दावा केला नाहीये.

भाजपकडे किती आमदार आहेत याचा आकडाही जाहीर केलेला नाही. जसं  महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे काही आमदार गायब होते तसंच मध्यप्रदेशमधले काँग्रेस आमदार गायब आहेत. मात्र अखेर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी या आमदारांचं मन वळवत त्यांना भाजपकडे जाण्यापासून रोखलं होतं तसंच आता ज्योतिरादित्य शिंदे यांनाही काही काँग्रेसचे नेते रोखतील का ? असे प्रश्न नक्कीच भाजपच्या मनात असतील. 

हेही वाचा: 'स्लॅपिंग थेरपी', कानाखाली मारल्याने मिळेल ग्लोईंग त्वचा: वाचा भन्नाट बातमी !  

त्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे "गायब झालेले आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि भाजपचे काही आमदारही संपर्कात आहेत, राज्यात काँग्रेस सरकार पडणार नाही, असा दावा करत आहेत. त्यामुळेच भाजपनं सावध पवित्रा घेतला आहे. आता अजून किती दिवस हे सत्तानाट्य चालणार याची कल्पना कोणालाही नाही. मात्र मध्यप्रदेशमध्ये सत्तास्थापन करण्याच्या बाबतीत भाजपचे नेते ताकही फुंकून पिणार हे नक्की.    

Jyotiraditya scindia may become Ajit pawar by taking Uturn in Madhyapradesh government formation BJPs prediction